मेट्रोमध्ये खाली बसणाऱ्या प्रवाशांकडून ३८ लाखांची वसूली

दिल्ली मेट्रोमध्ये खाली बसून प्रवास करणाऱ्यांकडून दंडापोटी ३८ लाख रुपयांची वसूली करण्यात आली आहे. गेल्या ११ महिन्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.  माहिती अधिकारांतर्गत ही आकडेवारी समोर आली आहे. तर, मेट्रोमध्ये घाण करणे, योग्य टोकन न घेता प्रवास करणे, प्रवासादरम्यान अडचणी निर्माण करणे यांसारख्या विविध गुन्ह्यांसाठी जून २०१७ ते मे २०१८ दरम्यान ५१ हजार लोकांकडून एकूण ९० लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना दिल्ली मेट्रोकडून (डीएमआरसी) याबाबत माहिती देण्यात आली आहे. सर्वाधिक दंड हा खाली बसून प्रवास करणाऱ्यांकडून वसूल करण्यात आला आहे. नियमानुसार मेट्रोमध्ये खाली बसून प्रवास केल्यास प्रवाशाकडून २०० रुपये दंड आकारला जातो.

डिएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, जून २०१७ ते मे २०१८ दरम्यान ५१ हजार ४४१ प्रवाशांकडून दंड स्वरुपात एकूण ८९ लाख ९४ हजार ३८० रुपये वसूल करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक दंड हा येलो लाइन मेट्रोने प्रवास करणाऱ्यांकडून आकारण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *