लहान मुलांचे १००० पॉर्न फोटो आणि ३८० व्हिडीओ, नराधमाला अटक; चार वर्षांची शिक्षा

अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या व्यक्तीवर चाइल्ड पॉर्न प्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत. न्यायालयाने कारागृहातून सुटका झाल्यानंतरही त्याला १० वर्ष नदरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे. अमेरिकेचे अॅटर्नी स्कॉट ब्रॅडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिट्सबर्ग येथे राहणाऱ्या २८ वर्षीय अभिजीत दासला चाइल्ड पॉर्न प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. न्यायालायने त्याला चार वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा अल्पवयीन मुलांच्या लैंगिक अत्याचाराला वाढ देणारी सामग्री बाळगल्याप्रकरणी देण्यात आली आहे.

न्यायालयात देण्यात आलेल्या माहितीनुसार, अभिजीत दासच्या कॉम्प्यूटरमध्ये ज्या फाईल्स सापडल्या आहेत त्यामध्ये १००० फोटो आणि ३८० व्हिडीओ आहेत. यावरुन अभिजीत चाइल्ड पॉर्नमध्ये किती मोठ्या प्रमाणात सक्रीय होता याचा अंदाज येत आहे. व्हिडीओंमध्येही अल्पवयीन मुलांचे आक्षेपार्ह फोटो सापडले आहेत.

अभिजीत दासवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लहान मुलांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्याचा आरोप लावण्यात आला होता. अनेक देशांमध्ये हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले जात होते. त्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये १००० हून जास्त भारतीय नागरिक होते. याशिवाय चीन, न्यूझीलंड, मेक्सिको, अफगाणिस्तान, पाकिस्तानसहित १८ देशातील नागरिकांचा समावेश होता. पोलिसांचा तपास अद्याप सुरु असून या रॅकेटमध्ये अजून कोण सामील होतं याचा शोध घेतला जात आहे. लहान मुलांचे फोटो, व्हिडीओ नेमके कुठून येत होते याचाही तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *