‘या’ टीव्ही अभिनेत्रीवर भरदिवसा हल्ला

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुपाली गांगुली हिच्यावर रविवारी दोन व्यक्तींनी भररस्त्यात हल्ला केल्याची घटना घडली. रुपाली गांगुली राहत असलेल्या वर्सोवा परिसरात हा प्रकार घडला. रुपाली गांगुली चार वर्षाच्या मुलाला शाळेत घेऊन जात होती. त्याचवेळी दोन तरुण मोटरसायकलवरुन आले. त्यांनी रुपालीची कार थांबवली आणि तिच्याशी वाद घातला. दोघांनी कारची काच फोडून रुपालीवर हल्ला केला.

रुपालीने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी काही तासांच्या आतच दोघा हल्लेखारांना गजाआड केले आहे. पोलिसांकडून सध्या या दोन्ही व्यक्तींची कसून चौकशी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *