एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे आज एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे. खंडाळा घाटात रेल्वेचा रुळ तुटला असल्याचे सुनीलकुमार या रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. परिणामी या मार्गावरून जाणार असलेली मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस थांबवण्यात आली आणि मोठा अपघात टळला. सुनीलकुमार यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.