बॉलिवूडचा गायक मिका सिंगच्या घरी चोरी

बॉलिवूडचा गायक मिका सिंगच्या घरी चोरी झाली आहे. मिका सिंगच्या मुंबई येथील घरात ही चोरी झाली आहे. मिका सिंगने याबाबत ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मिका सिंगच्या घरात जवळपास 3 लाखांची चोरी झाली आहे.

ही घटना रविवारी दुपारची आहे. जवळपास 2 वाजता ही चोरी झाल्याचं बोललं जातंय. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांचा शोध घेत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती मिका सिंगच्या घरी येतांना आणि जातांना दिसत आहे.

या चोरीचा आरोप एक पियानो आर्टिस्टवर करण्यात आला आहे. मागील 14 वर्षापासून तो मिका सिंगसोबत काम करत आहे. तो मिकाला भेटण्याच्या बहाण्याने घरी आला होता. असं देखील बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *