श्रीलंका दौऱ्यासाठी होणार १६ जणांच्या टीमची निवड!

श्रीलंका दौऱ्यासाठी होणार १६ जणांच्या टीमची निवड!

आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी इंडियन टेस्ट टीमचं सिलेक्शन करण्यात येणार आहे.

यावेळी, बांगलादेश दौऱ्यातलाच संघ कायम राखला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, यात एक बदल आहे… बांगलादेश दौऱ्यापेक्षा या दौऱ्यात एक खेळाडू जास्त म्हणजे १६ जणांची टीम या दौऱ्यासाठी निवडण्यात येणार आहे.

नमन ओझाचा समावेश राखीव विकेटकिपर म्हणून होऊ शकतो. १२ ऑगस्टपासून टीम इंडिया श्रीलंकेत ३ कसोटी सामने खेळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *