जळगावात गॅस सिलिंडर स्फोटात ३ कामगार ठार

केळी साठवणूक करण्यासाठीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात ३ कामगार जागीच ठार झालेत. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावात ही घटना घडली. या घटनेत आणखी काही कामगार जखमी झाल्याची शक्यता आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात अंतुर्ली गावात केळीच्या साठवणुकीसाठी खासगी कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहे. या कोल्ड स्टोरेजमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात ३ कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर अंतुर्ली ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *