गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या

 गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गणपती उत्सवासाठी सुरु करण्यात आलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने आणखी विशेष गाड्या सोडण्यात आल्यात. त्यामुळे ज्यांना आरक्षण करता आले नाही किंवा प्रतिक्षा यादीत असतील त्यांना तिकीट मिळणे शक्य होणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी पाहता कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल, बांद्रा, अहमदाबाद ते मडगाव आणि मंगलोर यादरम्यान विशेष गाड्या पश्चिम रेल्वेवरुन चालविण्यात येणार आहेत. मुंबई सेंट्रल / बांद्रा (टी) / अहमदाबाद आणि थिविम / मडगाव जंक्शन दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडय़ा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *