मराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाणी प्रश्न मिटण्याच्या मार्गावर

राज्यातील बहूतांश भाग हा पावासाविणा कोरडाठाक असला तरी, काही भागात मात्र पाऊस समाधानकारक पडला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणं भरू लागली आहेत. नाशिक जिल्ह्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्याच्या मार्गावर आहे.

मुंबईसह महाराष्ट्रही सुखावला..

नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. तर पूणे शहराचाही पाण्याचा प्रश्न मिटलाय. खडकवासला धरणातून पाणी सोडायला सुरूवात झालीय. मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर, विहार, तानसा हे तलाव भरून वाहू लागलेत. तर पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पिंपरी चिंचवडकर सुखावलेत.

राज्याच्या पर्जन्यवृष्टीत असमतोल

यंदाचा पावसाळा राज्यासाठी संमिश्र ठरत आहे. वातवरणातील बदल आणि लहरी वरूणरामुळे राज्याच्या पर्जन्यवृष्टीत असमतोल निर्माण झाला. राजधानी मुंबईसह उपराजधानी नागपूर आणि उर्वरीत महाराष्ट्रातील काही शहरं आणि गावांमध्ये पाणी घुसले. नद्यांना पूर आले. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. या सर्वांचा परिणाम राज्यात पाणीसाठा करणाऱ्या धरणांवर झाला आहे. राज्याचा मोठा भाग आजही कोरडाठाक असला तरी, काही धरणे मात्र पूर्ण क्षमतेने भरली आहेत. ओसंडून वाहत आहेत. काही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *