अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर घ्या ‘या’ आकर्षक ऑफर्सचा लाभ

पावसाळ्यात ज्याप्रमाणे बाजारातील दुकानांमध्ये सेलची रेलचेल असते. त्याचप्रमाणे ऑनलाईन शॉपिंगमध्येही वेगवेगळ्या ऑफर्स देत ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम ई-कॉमर्स कंपन्या करत आहेत. यामध्ये अॅमेझॉन आणि प्लिपकार्ट आघाडीवर असून एकमेकांना टक्करही देत आहेत. अॅमेझॉनने  प्राईम डे सेल तर फ्लिपकार्टने १६ जुलै ते १९ जुलैदरम्यान Big Shopping Days नावाने सेल आयोजित केला आहे. या सेलमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमधल्या वस्तूंवर भरघोस सूट मिळणार आहे. त्यात मोबाइल, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबरच घरगुती वस्तू आणि कपड्यांचाही समावेश करण्यात आला आहे. कंपनीने आपल्या या सेलला ‘ऑफर हो तो ऐसी’ अशी टॅगलाईनही दिली आहे. अॅमेझॉनचा महासेल ३६ तास चालणार असून फ्लिपकार्टचा सेल ८० तास चालणार आहे.

फ्लिपकार्टवरील खरेदीसाठी स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डनी पैसे भरल्यास त्वरीत १० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. याशिवाय फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना नो-कॉस्ट EMI चा पर्यायदेखील दिला आहे. फ्लिपकार्टने १५०० हून अधिक स्मार्टफोन मॉडेल्सवर सूट जाहीर केली आहे. या सेलमध्ये Google Pixel 2 हा १२८ जीबीचा फोन ४२,९९९ रुपयांना मिळणार आहे. गुगल पिक्सल 2 वर ३७ हजार रुपयांपर्यंत बायबॅक गॅरंटी तसेच ३ हजारांची एक्सचेंज आणि ८ हजारांची कॅशबॅक ऑफरदेखील मिळणार आहे.

फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर ८० टक्के सूट देणार आहे. तर घरगुती उपकरणे आणि टीव्हीवर ७० टक्के डिस्काऊंट मिळेल असे कंपनीने जाहीर केले आहे. या सेल वेगवेगळ्या वेळेला फायदेशीर ठरतील अशा अनेक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ‘ब्लॉकबस्टर डील’ जे प्रत्येक ८ तासानंतर रिफ्रेश होईल. ‘प्राईस क्रॅश डील’ हेही प्रत्येक ८ तासानंतर रिफ्रेश होणार आहे. ‘रश अवर डील’ जी फक्त २ तासासाठी असणार आहे. ही ऑफर संध्याकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत चालेल आणि ‘फर्स्ट टाईम ऑन डिस्काउंट’ ही डील देखील असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *