स्कूलबसच्या चाकाखाली येऊन तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. शिवम राघोते असे या मुलाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. शिवम बसमधून खाली उतरत असताना बस चालकाने बस पुढे नेली. त्यामुळे चाकाखाली येऊन शिवम चिरडला गेला आणि याच घटनेत त्याचा मृत्यू झाला. नागपुरातील उमरेडमध्ये ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने स्कूल बसच्या काचा फोडल्या. तसेच ड्रायव्हर परमेश्वर देशमुखला पोलिसांनी अटक केली आहे. वृंदावन कॉन्वेंट शाळेची ही बस होती. शाळेतून मुलांना घरी सोडण्यासाठी ही बस चालली होती त्याचवेळी हा प्रकार घडला. राघव बसमधून उतरला मात्र तो पुढे जायच्या आत ड्रायव्हरने बस पुढे नेली. ज्यामुळे राघव बसच्या चाकाखाली चिरडला गेला. त्यानंतर संतापलेल्या जमावाने बस फोडली. या घटनेमुळे राघोते कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.