आजपासून इंडिगोची मेगा ऑफर, केवळ 1212 रुपयांमध्ये विमानप्रवासाची संधी

विमानसेवा देणारी कंपनी इंडिगो एअरलाइन्सने आपल्या 12 व्या वर्षपूर्तीनिमित्त एक मेगा ऑफर आणली आहे. या दरम्यान इंडिगो तब्बल 12 लाख तिकीटांची स्वस्तात विक्री करणार आहे. अवघ्या 1212 रुपयांपासून तिकीटाची विक्री सुरू होत असून याद्वारे 57 शहरांपैकी कोणत्याही शहरात प्रवास करता येईल. आजपासून(दि.10) या ऑफरची सुरूवात झाली असून शुक्रवारपर्यंत या ऑफरचा लाभ घेण्याची संधी ग्राहकांकडे आहे.

10 जुलै ते 13 जुलैदरम्यान ही ऑफर आहे. यादरम्यान बूक केलेल्या तिकीटाद्वारे 25 जुलै 2018 ते 30 मार्च 2019 पर्यंत प्रवास करता येईल असं इंडिगोकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या ऑफरअंतर्गत डोमेस्टिक तसंच इंटरनॅशनल प्रवासाचं तिकीटही बूक करता येईल असं इंडिगोने सांगितलं. याशिवाय एसबीआयच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर असून एसबीआय कार्डद्वारे तिकीट बूक केल्यास 5 टक्के सूट दिली जाणार आहे. याद्वारे कमाल 500 रुपयांची सूट मिळू शकेल. पण यासाठी किमान 3 हजार रुपयांचं तिकीट बूक करणं गरजेचं आहे.

4 ऑगस्ट 2012 रोजी इंडिगोला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. हा 12 वर्षांचा प्रवास लक्षात रहावा यासाठी आम्ही 57 शहरांसाठी कोणत्याही विमान कंपनीचा देशातील सर्वात मोठा सेल घेऊऩ आलो आहोत. याद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांचे आभार मानू इच्छितो, ग्राहकांमुळेच एवढा प्रवास आम्ही करु शकलो असं इंडिगोचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर विल्यम बूल्टर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *