सातारा येथे एसटीचे चाक गेल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

बसस्थानकामध्ये डोक्यावरून एसटीचे चाक गेल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. शकुंतला जंगम असं या महिलेचं नाव असून, त्या सांगली जिल्ह्यातील सोनई गावच्या रहिवासी होत्या.  रविवारी सातारा स्टँडवर सुट्टीमुळे गर्दी होती, वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

शकुंतला एसटीच्या अगदी समोरुन जात असताना अचानक एसटी सुरु झाली आणि त्या चाकाखाली आल्या. सांगली फलाटाजवळ सातारा – सांगली ही एसटी लागत असताना ही दुर्घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मृत महिलेची बॅग सापडली, त्यानंतर त्यांची ओळख पटलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *