अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेतील कन्सास शहरात एका रेस्टॉरंटमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. शरत कोपू असं मृत विद्यार्थ्यांचं नाव असून तो मुळचा तेलंगणामधील वारंगल जिल्ह्यातला आहे. शरत हा युनिव्हर्सिटी ऑफ मिजोरी-कंन्सास सिटीमध्ये शिकत होता. अज्ञात हल्लेखोरांच्या एका टोळीनं रेस्टॉरंटमध्ये केलेल्या गोळीबारात शरतला पाच गोळ्या लागल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

कन्सास सिटी पोलिसांनी हा हत्या आणि लुटीचा प्रकार असल्याचं सांगितलं आहे. तसंच संशयित हल्लेखोराचा व्हिडिओ प्रसिद्ध करुन हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला १० हजार डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *