कोल्हापूर येथील घाटातून कार दरीत कोसळून ५ ठार

 जिल्ह्यातील तिलारी घाटात झालेल्या अपघातात पाच जण ठार झालेत. अपघातातील सर्व मृत हे बेळगाव जिल्ह्यातील आहेत. घाटातील लस्कर पॉईंटजवळ व्हॅगन आर गाडी दरीत कोसळली. यात तीनजण जागीच ठार झालेत. तर दोघेजण गंभीर जखमी झाले होते. या दोघांचाही मृत्यू झालाय.

तिलारी नजीक असलेल्या कोदाळी येथील सूर्यास्त पॉईंट तथा लष्कर पॉईंटवरून कार दरीत कोसळली. या अपघातात ५ युवकांचा मृत्यू झाला.  हा अपघात आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला. हे पाचही युवक बेळगावचे असुन ते वर्षा पर्यटनासाठी आले होते.  दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. याकामी ग्रामस्थ आणि पोलिसांनी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *