चिमुरड्याचा कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडून मृत्यू

मुंबईच्या गोवंडी शिवाजीनगर भागात कचऱ्याच्या ट्रक खाली चिरडून पाच वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्देवी अंत झालायं. मोहम्मद गौस दस्थगिर अहमद असं या मुलाचं नाव आहे. शिवाजी नगरच्या प्लॉट क्रमांक 28 आणि 29 मध्ये असलेल्या रस्ता क्रमांक 4 च्या आपल्या घरातून तो बहिणी सोबत बाहेर आला. अचानक समोरून येणाऱ्या कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडला गेला.त्याला स्थानिकांनी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

तणावाचे वातावरण 

त्याचे वडील दुबईत नोकरी करतात. त्याच्या मृत्यूनं या विभागात शोककळा पसरलीय. इथून ये जा करणाऱ्या कचऱ्याच्या ट्रकबाबत स्थानिक जनतेमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांच्या गाडीवरही स्थानिकांनी दगड फेक केली आणि कचऱ्याच्या गाडीवर हल्ला केला. यात ड्रायव्हर आणि तीन कामगारांवर हल्ला केला. सध्या या विभागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस तपास करतायत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *