भाजप आमदाराच्या किंमती कुत्र्याची चोरी

जळगावात सध्या दिवसाढवळ्या चोरी, लूटमार आणि घरफोडीच्या घटना वाढल्यात. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आता व्हिआयपीसुद्धा चोरट्यांचे लक्ष्य बनलेत. शहरातील जयनगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या भाजप आमदार चंदूलाल पटेल यांच्या दारातून लॅबरेडॉर जातीच्या कुत्र्याची चोरी करण्यात आलीय. दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी हे पटेल यांच्या दारातून हा कुत्रा पळवलाय. चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. या संदर्भात रामानंद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *