नववीतल्या मुलीची आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

नववीतल्या मुलीची आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

कांदिवलीमध्ये नववीत शिकणाऱ्या एका मुलीनं आत्महत्या केलीय. इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन तिनं आत्महत्या केलीयं. कांदिवलीतल्या ठाकूर व्हिजेलमध्ये ही घटना घडलीय. आमची जबाबदार वृत्त वाहिनी असल्याने संपूर्ण व्हीडिओ आम्ही दाखणार नाही.

थांबविण्याचा प्रयत्न 

समोरून ज्यांनी या मुलीला आत्महत्या करताना पाहिल त्यांनी तिला अडविण्याचा प्रयत्न केला. . या इमारतीच्या ५ विंग असून ती मुलगी उडी मारताना स्पष्ट दिसत होती. ही मुलगी शेजारच्या इमारतीत राहणारी होती. तिच्या आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीत्यावेळी वॉचमनलाही बोलवण्यात आलं. लोकांनी आरडाओरडा सुरू केला पण या सर्वाचा काही फायदा झाला नाही.

अनेक प्रश्न उपस्थित 

या आत्महत्येमुळे व्यवस्थेविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या ठिकाणी मुलगी पोहोचलीच कशी ? सुरक्षारक्षक कुठे होता ? सीसीटीव्ही होता का ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *