विनातिकीट रेल्वे प्रवाशांना हजार रुपये दंड?

लोकल प्रवासात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना यापुढे किमान २५० रुपयांवरून थेट चार पट अधिक म्हणजे एक हजार रुपयांच्या दंडाचा सामना करावा लागणार आहे. फुकट्या प्रवाशांच्या समस्येवर जादा दंडाच्या रक्कमेने कायमस्वरूपी चाप बसेल, असा रेल्वे अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो. त्याचवेळी विनातिकीट प्रवासात तिकीट खिडक्यांवरील रांगा हादेखील प्रमुख घटक ठरला आहे. तिकीट खिडक्यांवरील गर्दीमुळे अनेकदा विनातिकीट प्रवास करावा लागत असल्याकडेही लक्ष वेधले जात आहे. त्यामुळे या जादा दंडाच्या रकमेस विरोध होण्याचीही शक्यता आहे.

लोकलमधील फुकट्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ती कमी करण्यासाठी दंडाची रक्कम ५० रुपयांवरून २५० रुपये करण्याचा निर्णय २००२मध्ये घेण्यात आला. त्यानंतर या दंडाच्या रक्कमेत कोणतीही वाढ झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *