आमदार झोपले स्माशानात… मिळाला डासांचा प्रसाद

आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील तेलगूदेसम पक्षाच्या आमदाराने चक्क एक रात्र स्मशानात जोपून काढली. आमदारांनी स्मशानात झोपण्याचे कारण ऐकाल तर थक्क व्हाल. आजच्या विज्ञान युगातही लोकांना भूत, पिशाच्च आदी गोष्टींची भीती वाटते. म्हणूनच लोकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी आमदार मोहदयांनी चक्क स्मशानातच एक रात्र घालवली…

कामगारांच्या मनात भूताची भीती

निम्मला रामा नायडू हे तेलगू देसम पक्षाचे आमदार आहेत. त्यांच्याच मतदारसंघातील एका गावात स्मशानभूमीचे नुतनीकरण करायचे होते. पण, या कामात अडथळा होता कामगारांच्या मनात असलेल्या भीतीचा. स्मशानभूमीत काम करण्यासाठी कोणीही कामगार तयार होत नव्हता. स्मशानात भूत, पिशाच्च असतात त्यामुळं आपण स्मशानात काम करू तर, आपणासही त्याची बाधा होऊ शकते. अशी या कामगारांची धारणा होती. यावर आमदार नायडू यांनी कामगारांना असे काही नसते हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मग नायडू यांनी या कामगारांसाठी प्रात्यक्षिक करण्याचाच निर्णय घेतला. आमदार महोदय रात्रीच्या वेळी थेट स्मशानात गेले. ते केवळ स्मशानात गेलेच नाही तर, त्यांनी संपूर्ण रात्र स्मशानातच झोपून काढली. कामगारांच्या मनातील भीती दूर करण्यासाठीच त्यांनी हे पाऊल उचलले.

भूत दिसले नाही पण, डासांनी फोडून काढले

दरम्यान, स्मशानात झोपण्याच्या आनुभवाबाबत बोलताना आमदार म्हणाले, मी स्मशानात मी रात्रभर झोपलो. मला भूत, पिशाच्च वैगेरे काहीच दिसले नाही. पण, डासांनी मात्र, चांगलेच फोडून काढले. अखेर मी मच्छरदानी लावली. मग कुठे डासांचा त्रास संपला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *