पाच मिनिटांत येतो सागूंन आईला रेल्वे स्थानकात सोडलं

मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. आई आणि मुलाच्या नात्याचा दाखला दुनियेत दिला जातो. पोटच्या बाळाला लहानाचं मोठ करताना तहान भूकही विसरून जाते. पण बरीच मुलं म्हातारपणी तिची काय अवस्था करतात याचा विचार न केलेलाच बरा.  नालासोपाऱ्यात एक आई तिच्या मुलाची गेल्या तीन महिन्यांपासून वाट पहातीये.. निर्दयी मुलानं भर पावसात जन्मदात्या आईला वाऱ्यावर सोडून पळ काढलाय.. सध्या या माऊलीनं एका मंदिराचा आसरा घेतलाय. शेजारी राहणारी मंडळी तिच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत.

आईला घरी जायचंय

पाच मिनिटात येतो म्हणून सांगून गेलेला मुलगा तीन महिने तरी आला नसल्याच समोर आलंय. कोणी वडापाव आणून देतंय तर कोणी पाणी आणूण देतय.  त्याामुळे आपल्यापैकी कोणी या आईला ओळखत असाल तर तिला घरी पोहोचविण्यास नक्की सहकार्य करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *