अपमानाचा सूड घेण्यासाठी तिनं जेवणात विष टाकलं

सुभाष रामचंद्र माने यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीच्या जेवणातून सुमारे ८६ जणांना विषबाधा होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथे घडली. या प्रकारणात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विषबाधेच्या या घटनेचा तपास करत असताना ही विषबाधा ही किटकनाशक वापरल्यानं झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात सुभाष माने यांची नातेवाईक असलेली प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे हिला अटक करण्यात आली आहे.

प्रज्ञा उर्फ ज्योती हिचं सुरेश सुरवसे याच्याशी दुसरं लग्न झालं होतं. मात्र कुटुंबातील सर्वजण नेहमी तिचा अपमान आणि मानसिक छळ करत असत. ज्योतीचा रंग, तिला स्वयंपाक न येणं, तिचा पहिला विवाह मोडणं यांवरून तिला सतत हिणवलं जात असत. याचाच राग मनात ठेवून या सर्वाना धडा शिकण्यासाठी तिनं हे कृत्य केल्याचं कबूल केलं आहे.

वास्तुशांतीच्या दिवशी ज्योतीनं कीटकनाशक औषध विकत आणलं संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तिनं वरणाच्या बादलीत हे विषारी किटकनाशक औषध टाकलं . ज्योती हिच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे. तिच्या कटात आणखी कुणाची साथ होती का, याचाही तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *