शाळेकडून मुलाचा दाखला न मिळाल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुलांची फी भरूनही दहावी उत्तीर्ण मुलांचा दाखला दिला नाही, म्हणून विश्रांती भुसनर या महिलेनं शाळेसमोरच गळपास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर तालुक्यातल्या वाखरीमधल्या एम आयटी संस्थेच विश्वशांती निवासी गुरूकुल विद्यालय आहे. या शाळेत विश्रांती भुसनर यांची सौरभ आणि आदित्य भुसनर ही दोन मुलं शिक्षण घेत होती. त्यांची फी भरुनही शाळा दाखला देत नव्हती. उलट त्यांच्याकडून सहा लाखांची मागणी केली जात होती, असा भुसनर यांचा आरोप आहे. दाखला न मिळाल्यानं दोन्ही मुलांना अकरावी प्रवेश घेता येत नव्हता. त्यामुळे विश्रांती यांनी शाळेसमोर गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तिुथे उपस्थित पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढचा अनर्थ टळला. याबाबतीत शाळेकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *