गळ्यावर चाकू ठेवून दारु पाजली, रात्रभर केला रेप

लखनऊ  महानगरच्या विज्ञानपुरी वसाहतीत घर काम करणाऱ्या महिलेवर घर मालकाच्या मुलाने चाकूचा धाक दाखवला आणि चाकू गळ्याला लावला. त्यानंतर त्याने तिला दारु पाजली आणि रात्रभर अनेकवेळा बलात्कार केला. पीडित महिलेने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे गाठून आपल्यावरील ओढवलेला प्रसंग सांगून तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी झोपेत असलेल्या तरुणाला अटक केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली.

महानगरमधील रहिवासी महिला पतीपासून वेगळी झाल्यानतर दोन मुलांसोबत राहते. विज्ञानपुरी वसाहतीतील लवकुश शर्मा यांच्या घरात काम करत असे. हि महिला दुपारचे जेवण करण्यासाठी घरी गेली. त्यावेळी लवकुश एकटा होता. वडील तीर्थयात्रेला गेल्याचे सांगून तिला घराची सफाई करण्यास सांगितले. घराची सफाई करताना तिला संध्याकाळ झाली. त्यानंतर ती आपल्या घरी जाण्यास निघाली असता लवकुशने तिला थांबविले आणि आपल्या खोलीत नेले. तिथे तिची छेडछाड काढण्यास सुरुवात केली. तिने याला विरोध केल्यानंतर त्याने तिची मान पकडली आणि गळ्याला चाकू लावला.

तिच्या गळ्यातून रक्त आल्याने ती घाबरली. त्यानंतर लवकुशने दारुची बाटली आणली आणि तिला जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर स्वत: दारु प्राशन केली. रात्री ९ ते सकाळी ४ वाजेपर्यंत लवकुशने अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी झोपी गेला. या संधीचा फायदा घेत पीडित महिला तेथून बाहेर पडली आणि थेट पोलीस स्टेशन गाठले. तिने याबाबत पोलिसांना माहिती देत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी पीडित महिलेला सोबत घेऊन पाच वाजता आरोपीचे घर गाठले. त्यावेळी तो गाढ झोपेत होता. यावेळी पोलिसांनी घर आणि स्वयंपाक घराची पाहणी केली. त्यावेळी महिलेचे कपडे आणि दारुच्या बाटल्या सापडल्यात. त्यानंतर पोलिसांनी लवकुशला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *