मरिन ड्राईव्हवर जोडप्याचे अश्लील चाळे

मरिन ड्राईव्ह येथे भररस्त्यात दुभाजकावर एका जोडप्याने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एका परदेशी नागरिकाला ताब्यात घेऊन चौकशीनंतर सोडून देण्यात आले असून सदर महिलेला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

क्वीन्स नेकलेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या मरिन ड्राईव्हवर अनेक जोडपे फिरायला येतात. या परिसरात तरूण-तरुणींची नेहमीच वर्दळ असते. मात्र या जोडप्याने थेट भररस्त्यावरील दुभाजकावर बसून अश्लील चाळे करायला सुरुवात केली. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या नसत्या तर नवलंच! अनेक आंबटशौकीनांनी या जोडप्यांचे फोटो काढले तर काहींनी व्हिडिओ काढून ते व्हायरलही केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या जोडप्यांना ताब्यात घेतले. या दोघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. हे दोघं गोव्यातून आल्याचं त्यांच्या चौकशीतून स्पष्ट झालं. मात्र पत्ता आणि नातलगांचा नंबर देण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, या महिलेचं मानसिक स्वास्थ बिघडलेलं असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी तिची रवानगी चेंबूरच्या महिला सुधारगृहात केली. तर संबंधित परदेशी नागरिकाला तंबी देऊन सोडून देण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *