सध्या सोशल मीडियावर डब्बू अंकलचा जलवा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गोविंदा स्टाईलने डान्स केल्याने लोकप्रिय झालेले डब्बू अंकल सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी सोनी टी.व्ही. वरील दस का दम मध्येही त्यांनी उपस्थिती लावली होती. आता त्यांना जाहिरातीच्या ही ऑफर्स येत आहेत. पण सुपरस्टार गोविंदाला भेटणे हे डब्बू अंकलचे सर्वात मोठे स्वप्न होते. लोकप्रिय होण्यासाठी वर्षानुवर्षे महेत करावी लागते. पण डब्बू अंकल ऊर्फ संजीव श्रीवास्तव यांच्या भाळी रातोरात प्रसिद्ध होण्याचे लिहिले असावे. एका डान्स व्हिडिओमुळे रातोरात ते लोकप्रिय झाले. आता त्यांच्या जबरदस्त चाहते आहेत. अलिकडेच त्यांनी माधुरी दीक्षितच्या डान्स रियालिटी शो ‘डान्स दिवाने’च्या सेटवर हजेरी लावली. तेव्हा त्यांची भेट सुपरस्टार गोविंदाशी झाली.
