पतीनं पत्नीसह दीड वर्षाच्या मुलीला विष पाजून घेतली फाशी

विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) लहान आर्वी येथील अनिल नारायण वानखडे (वय 37) यानं पत्नी स्वाती अनिल वानखडे, मुलगी आस्था (वय दीड वर्ष) या दोघांसह विष पिऊन नंतर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वडिलांशी झालेल्या वादातून हे तिघे काल (मंगळवारी) सायंकाळी सात वाजता ते घराबाहेर पडले. त्यानंतर विषारी औषध विकत घेऊन अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात प्राशन करून झाडाला दोरीने फाशी लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *