प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश आणि त्याची बालपणीची मैत्रीण श्लोका मेहता यांचा विवाह डिसेंबर होईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या साखरपुडा ३० जून २०१८ रोजी होत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, काल रात्री नीता अंबानी या मुलगा अनंत याच्यासोबत मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचल्यात.
नीता अंबानी आणि मुलगा अनंत अंबानी या मायलेकांनी साखरपुड्याआधी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले आणि पहिले निमंत्रण गणपतीला दिले, असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. काल रात्री नीता अंबानी आणि मुलगा अनंत हे दोघे मंदिराबाहेर दिसून आलेत. आकाशने २४ मार्च २०१८ रोजी गोव्यात आपली बालमैत्रिण श्लोका मेहता हिच्यासोबत प्री-एंगेजमेंट सेरिमनी झाली होती. यावेळी दिग्गज लोक सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात समारंभ पार पडला होता. आता ३० जून २०१८ रोजी दोघांच्या साखपरपुड्याचा मुहूर्त काढण्यात आल्याची माहिती आहे.
