SSC Results 2018: दहावीचा निकाल 8 जूनला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

मागील काही दिवसांपासून दहावी निकालाबाबत सोशल मिडियावर विविध तारखा व्हायरल होत होत्या. अखेर मंडळाने शुक्रवारी निकाल लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले. परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळालेले गुण तीनपैकी कोणत्याही संकेतस्थळावर उपलब्ध होतील. या निकालाची विद्यार्थ्यांना प्रिंट घेता येईल. तसेच हा निकाल एसएमएस सेवेद्वारे मोबाईलवरही उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

या वेबसाइटवर पाहता येणार निकाल

www.mahresult.nic.in

  • www.result.mkcl.org
  • www.maharashtraeducation.com
  • www.rediff.com/exams
  • http://maharashtra10.jagranjosh.com
  • कसा पाहाल निकाल?                                                                                                                                                                                                                    दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर P123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात P123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *