राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल आज, बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी तीन लाख ३० हजार ८२३ विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत.
निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करायचा आहे, त्यांना तो करता येणार आहे. हा अर्ज करण्यासाठी ३१ मे ते ९ जून अशी मुदत देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनाही जुलै-ऑगस्ट २०१८ व फेब्रुवारी २०१९ या पुढील परीक्षांमध्ये संधी मिळणार आहे.
१) www.mahresult.nic.in
२) ww.resul.mkcl.org
३) www.maharashtraeducation.com
