केवळ नावालाच दिलासा; पेट्रोल-डिझेल दरात अत्यल्प घट

सोळा दिवसांच्या सततच्या इंधन दरवाढीला अखेर ब्रेक लागलाय. सतराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५९ पैशांनी स्वस्त झालंय. मुंबईत पेट्रोलचे दर ८५ रुपये ६५ तर डिझेलचे दर ७३ रुपये २० पैसे इतका झालाय. सततच्या दरवाढीने त्रासलेल्या सामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण आल्याने येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

दरवाढीने जनता हैराण

दरम्यान, दरवाढीनं जनता हैराण असली, तरी सरकार मात्र त्यावर काही ठोस पावलं उचलताना दिसत नाहीय. मंत्रिगट इंधन दरवाढीवर उपाय योजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलाय. हा मंत्रीगट लोकांचा मनस्ताप कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, इतकं उत्तर सध्या सरकारच्या वतीनं देण्यात येत आहे.

जनतेचा आशावाद कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील दरही लवकरच कमी होण्यास सुरुवात होईल अशी आशा करायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *