नागाव समुद्रात समुद्रात बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू

रायगड येथील नागांव येथे समुद्रात तीन जण रात्री पासून बेपत्ता असल्याची बातमी समोर येत आहे. दरम्यान या सागरी किनाऱ्यावर तिन मृतदेह आढळल्याचे वृत्तही समोर येत आहे. दरम्यान पोलिसांकडून याप्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे. अलिबाग तालुक्यातील दुर्देवी घटना घडली आहे. हजारो पर्यंटक इथे पर्यटनासाठी येतात. पण समुद्राच्या पाण्यात उतरताना पाहिजे तशी काळजी घेतली जात नाही हे वारंवार समोर येत आहे. पावसाच्या आगमनाचे दिवस असल्याने काल संध्याकाळच्या वेळेस पाण्याला उधाण आल होत. अशा हे तिघजण पाण्यात उतरले होते. नवी मुंबईच्या कोपर खैरणे येथील पर्यटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस तसेच कोस्टगार्ड कडून यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *