लग्नाआधीच गरोदर झाल्यामुळं नेहानं घाईघाईनं लग्न केलं ही निव्वळ अफवा आहे. कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक नेहाचं लग्न झाल्यामुळं लोक अशा चर्चा करत आहेत. त्यात काहीही तथ्य नाही,’ असा खुलासा खुद्द अभिनेत्री नेहा धुपियाचे वडील प्रदीप धुपिया यांनी केला आहे.
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री नेहा धुपिया हिनं नुकताच अभिनेता अंगद बेदी याच्याशी गुपचूप विवाह केला. या सोहळ्याला मोजकेच लोक उपस्थित होते. या लग्नाबद्दल कुणालाही आधी माहीत नव्हतं. सर्वांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. त्यामुळंच लग्नानंतर चर्चेला उधाण आलं होतं. नेहा गर्भवती राहिल्यामुळं हे लग्न उरकण्यात आलं, असं बोललं जात होतं. लग्नानंतर नेहा सैलसर कपडे घालत असल्याकडंही बोट दाखवण्यात येत होतं.
नेहानं याबाबत कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी तिच्या वडिलांना राहावलं नाही. एका मुलाखतीत त्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. ‘नेहा आणि अंगद यांनी अचानक लग्न केल्यामुळं लोक असली चर्चा करत आहेत. पण