क्युबामध्ये विमान कोसळले

क्युबामधील सरकारी विमान कंपनीचे बोइंग ७३७ हे प्रवासी विमान उड्डाणानंतर लगेचच विमानतळाजवळच कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. या विमानात १०४ प्रवासी होते. यापैकी १०० हून अधिक प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. राजधानी हवाना येथील जोस मार्टी विमानतळावरून निघालेले हे विमान होलगीनला जाणार होते.

क्युबातील देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणारे हे विमान होते. या दुर्घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दुर्घटना घडताच बचाव मोहीम राबवण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *