आज पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

बोरीवली आणि भार्इंदर स्थानकांदरम्यान शनिवार मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटे ते रविवार पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत रात्रकालीन जम्बोब्लॉक पश्चिम रेल्वेने घोषित केला आहे.
ब्लॉक कालावधीत बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रेल्वे सिग्नल दुरुस्ती आणि रुळांच्या देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येतील. ब्लॉक काळातील काही लोकल फेºया रद्द करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *