गुजरातमध्ये सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटला, १९ ठार

गुजरातमधील भावनगर- अहमदाबाद महामार्गावर सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटल्याने १९ जणांचा मृत्यू झाला.या भीषण अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भावनगर- अहमदाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. या भीषण अपघातात ट्रकमधील १९ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *