एका बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्या 2 मुली…

प्रेम आणि धोका असा अजब प्रकार एक समोर आला आहे. छत्तीसगडच्या रायगडमध्ये दोन मुलींनी प्रेमात अगदी कहर गाठला आहे. प्रेमाच्या परिसिमा गाठताना या मुली एकाच बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्या आहेत. मात्र खरा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा बॉयफ्रेंडने पहिल्या मुलीसोबत मिळून दुसऱ्या मुलीला धोका देण्याचा निर्णय घेतला. बॉयफ्रेंडच्या या अजब प्रकारामुळे हैराण झालेल्या दुसऱ्या मुलीने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

कुठे आणि कसा घडला हा प्रकार

रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलाने गावातील दोन मुलींवर प्रेम केलं. प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोन्ही तरूणींनी मुलासोबत पळून जाण्याचा प्लान केला. पळून गेलेल्या या तिघांनी पहिल्यांदा दिल्ली गाठली. तिथून झारखंडच्या टाटा नगरमध्ये पोहोचले. आणि तिथेच बॉयफ्रेंडने चालाकी केली आणि दुसऱ्या मुलीला उत्कल ट्रेनमध्ये बसवलं आणि पहिल्या मुलीला घेऊन फरार झाला.

ट्रेन सुरू झाल्यावर सगळा प्रकार मुलीच्या लक्षात आला. तेव्हा तिने रडायला सुरूवात केली. रडल्यानंतर आजूबाजूच्या सहप्रवाशांनी काय प्रकार झाला हे जाणून घेऊन मुलीच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. बॉयफ्रेंडकडून मिळालेल्या या वागणुकीमुळे मुलगी धक्क्यात आहे. पोलिसांनी या प्रकरणात बॉयफ्रेंडवर गुन्हा दाखल केला आहे. आणि पहिल्या मुलीला देखील चौकशीसाठी बोलावलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *