पालघर तालुक्यातील सातपाटी येथील बंदरात मासेमारीसाठी नेलेल्या ‘शिवनेरी’ बोटीला अपघात झाला असून १२ खलाशी समुद्रात अडकले आहेत.
पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी कोस्ट गार्डशी संपर्क साधून तातडीने मदतीसाठी प्रयत्न करा असे आवाहन केले आहे.
त्यामुळे या खलाशांना वाचविण्यासाठी आता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
