सॅमसंगचा गॅलॅक्सी सी ७ प्रो स्मार्टफोनची किंमत ६००० रुपयांपर्यंत कमी झालीये. आता हा स्मार्टफोन २१,९०० रुपयांना मिळचोय. गेल्या वर्षी लाँचिगदरम्यान कंपनीने या स्मार्टफोनची किंमत २७,९९० रुपये इतकी ठेवली होती. अॅमेझॉन इंडिया एक्सक्लुझिवह राईटअंतर्गत हा विकला जातोय. कंपनीच्या माहितीनुसार, याची किंमत कमी करण्यात आलीये. पेटीएम मॉलवरुन खरेदी केल्यास यावर २५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही मिळतोय. दरम्यान अॅमेझॉनवर हा स्मार्टफोन स्वस्त मिळेल. हा फोन गॅलॅक्सी सी ९ प्रोशी मिळताजुळता आहे.
फोनचे डिझाईन आहे आकर्षक
सॅमसंग गॅलॅक्सी सी ७ प्रोची खासियत म्हणजे त्याची डिझाईन आहे. हा बारीक आणि बॉडी मेटल युनिबॉडीची आहे. फोनमध्ये फ्रंट आणि रेयर कॅमेऱ्यावर १६ मेगापिक्सेलचा सेन्सर देण्यात आलाय. याचे वजन १७२ ग्रॅम आहे. स्मार्टफोनची बॅटरी ३३०० एमएएचचा आहे. तसेच फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. याशिवाय गॅलॅक्सी सी ७ प्रोमध्ये ऑल्वेज ऑन डिस्प्ले आणि सॅमसंग पे फीचर देण्यात आलाय. यात इनबिल्ट स्टोरेज ६४ जीबी असून २५६ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे.
गॅलॅक्सी सी ७ प्रो हँडसेट ६.०१ मार्शमेलोवर चालतो. यात ५.७ इंचाचा १०८० पिक्सेल रेझोल्युशन एमोलेड डिस्प्ले आहे. यात २.२ गिगाहर्टझ ओक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६२६ चिपसेटसह ४ जीबी रॅम आहे.
सुरुवातीला अडीच हजार रुपये किंमत कमी घटवली होती
काही दिवसांपूर्वी हा फोन बाजारात २४,९९० रुपयांना मिळत होता. कंपनीने याची किंमत आणखी कमी केलीये. सॅमसंगच्या साईटवर हा फोन २४,९०० रुपयांच्या टॅगसह दिसतोय. पेटीएम मॉलवरुन खरेदी केल्यावर हा फोन २२,४०० रुपयांना मिळेल.
