विमान हवेत असताना खिडकीचे पॅनेल निखळले, ३ प्रवासी जखमी

एअर इंडियाच्या विमानात जोरदार झटका लागल्याने तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा झटका इतका जबरदस्त होता की, विमानाच्या खिडकीचे आतील पॅनल निखळलं. त्यामुळे विमानातील अनेक सीट्सचे ऑक्सिजन मास्कही बाहेर आले. अमृतसरहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या विमानात ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर विमानातील प्रवाशांमध्ये १५ ते २० मिनिटे गोंधळाचं वातावरण होतं. नवी दिल्लीत लँडिंगनंतर तीन जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटना प्रकरणी आता चौकशी सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *