जातीच्या दाखल्यासाठी कोळी समाजाचा मोर्चा

कोळी समाजाला जातीचे दाखले वेळेवर मिळावेत, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळाने करवीर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. समाजाच्या वतीने करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कोळी महादेव, टोकरे कोळी, कोळी ढोर, कोळी मल्हार या जमातीच्या सदस्यांना त्रास अगर जबरदस्ती न करता जातीचे दाखले द्यावेत. १९५० च्या पूर्वीचा जातीचा दाखला देताना पुराव्याचा आग्रह धरू नये, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *