कोल्हापूर-मुंबई विमानसेवा उद्यापासून

उद्घाटनापूर्वीच कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराज विमानतळावरून रविवार (ता. २२) पासून कोल्हापूर-मुंबई नियमित विमानसेवा  सुरू होत आहे. अतिरिक्त कार्यभार असलेले केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते २३ एप्रिलला विमानसेवा उद्घाटन सोहळ्याचे नियोजन होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाल्याने उद्घाटनाचा सोहळा आणखी लांबणीवर पडला आहे.

राज्य सरकारने विमानसेवेचे अधिकृत उद्घाटन रविवारी होत असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी तयारीही सुरू केली होती. एअर डेक्कन कंपनीकडून दोन दिवस विशेष विमानाचे उड्डाण कोल्हापूर विमानतळावरून केले होते. कंपनीकडून दर मंगळवार, बुधवार आणि रविवारी विमानसेवा दिली जात आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूरहून मुंबईकडे विमानाचे उड्डाण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *