विरारमध्ये दहावीतील विद्यार्थीनीवर चाकूहल्ला

विरारमध्ये दहावीतील विद्यार्थीनीवर चाकूहल्ला

दहावीत शिकणाऱया विरारमधील एका विद्यार्थीनीवर सोमवारी तिच्या घराजवळ चार-पाच तरुणांनी हल्ला केला. चाकूने या विद्यार्थीनीवर वार करण्यात आले असून, या हल्ल्यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर विरारमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून काही तरूण या विद्यार्थीनीची छेड काढत होते. तिने वेळोवेळी त्याचा प्रतिकार केला होता. या घटनेचा राग डोक्यात धरून हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेताहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *