ऐश्वर्या रायने घेतला २१ कोटींचा फ्लॅट

ऐश्वर्या रायने घेतला २१ कोटींचा फ्लॅट

माजी विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या एका लक्झरी रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये २१ कोटी रुपयांना नुकताच एक फ्लॅट खरेदी केला आहे. बीकेसीतल्या ‘सिग्निया आयल्स’मधल्या या फाइव्ह बेडरूमच्या आलिशान फ्लॅटचं क्षेत्रफळ तब्बल ५,५०० चौ.फूट असून त्यात सर्व सोयीसुविधा आहेत.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्याच आठवड्यात या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन झालं. ३८,००० रु. प्रति चौ.फूट अशा दराने खरेदी-विक्रीचा हा व्यवहार झाला. सनटेक रियल्टीचे सिग्नेचर आयलंड, सिग्निया आयल्स आणि सिग्निया पर्ल असे तीन टॉवर्स आजूबाजूला आहेत. त्यातल्या सिग्निया आयल्समध्ये ऐश्वर्याने घेतलेला फ्लॅट आहे.

अलिकडेच सोनम कपूरने सिग्नेचर आयलंडमध्ये ड्युप्लेक्स अपार्टमेण्ट खरेदी केलं आहे. ७,००० चौ.फुटांच्या या ड्युप्लेक्स अपार्टमेण्टसाठी सोनमने ३५ कोटी मोजले. हे तेच अपार्टमेण्ट आहे ज्यात काही महिन्यांपूर्वी अब्जाधीश बँकर उदय कोटक यांनी सोनमसारखंच घर खरेदी केलं आहे. २०१३ मध्येही याच बिल्डिंगमध्ये सिटी ग्रुपचे माजी अध्यक्ष विक्रम पंडित आणि डॉईश बँकेचे एशिया/पॅसेफिकचे को-एक्झिक्युटिव्ह ऑफिसर गुनीत चढ्ढा यांनी घर घेतलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *