प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा रद्द

दिल्लीहून मुंबईला रात्री उशिरा पोहोचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांचा जळगाव दौरा ऐनवेळी रद्द झाला आहे. अप्पासाहेब पवार पुरस्कार वितरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जळगावात दाखल झाले आहेत.
विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी ३० मार्च रोजी मुख्यमंत्री जळगाव जिल्ह्यात येणार होते. मात्र २९ रोजी दिल्ली येथे अण्णा हजारे यांच्या उपोषणाची सांगता करण्यासाठी गेले होते. तेथून मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुंबई येथे पोहचले. त्यानंतर प्रकृती बिघडली, मात्र तरीदेखील औषधोपचार घेऊन त्यांचा जळगावला येण्याचा प्रयत्न होता, मात्र सकाळी ९.३० वाजता दौरा रद्द झाल्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकृतपणे कळविण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यात होणाऱ्या विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील करण्यात येत आहे. सोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *