पुण्यातील धायरीत अज्ञात व्यक्तीने महागड्या गाड्या जाळल्या

पुण्यातील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन महागड्या गाड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितानुसार, पुण्यातील धायरी परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ऑडी आणि होंडा सिटी या आलिशान गाड्या जाळण्यात आल्या आहेत. या आगीमध्ये दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या असून बुधवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये दुचाकीवरुन आलेल्या दोन व्यक्तींपैकी एकाने या गाड्यांना रॉकेल ओतून आग लावल्याचे दिसत आहेत.
दरम्यान, या महागड्या गाड्या पेटवून देणारे कोण आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. मात्र, गाड्या पेटवून देणा-या व्यक्तीने हे  कृत्य पूर्व वैमनस्यातून केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट घेतली असून सीसीटीव्हीच्या आधारे गाड्या पेटवणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *