शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचे निधन

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या माजी सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.

नटराजन यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्यांना गेल्या आठवड्यात चेन्नईतील ग्लेनीगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. परंतु, शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

नटराजन यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, नटराजन यांच्या अंत्यविधीसाठी शशिकला यांना पॅरोल मंजूर होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *