अहमदनगरमधील माळीवाडा परिसरातील ढोर गल्लीत असलेल्या एका कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. स्फोटात तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मारुती कुरिअर कंपनीच्या कार्यालयात हा स्फोट झाला आहे. कंपनीचे कर्मचारी रात्री दहाच्या सुमारास एक पार्सल सोडत होते. याचवेळी अचानक स्फोट झाला. यात तीन जण जखमी झाले. तिघांनाही तातडीने आनंदऋषी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचं कारण अद्याप कळू शकलेलं नसून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तपास सुरू आहे.