कोकणातील आंब्यांच्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश

अवकाळी पावसामुळे कोकणात आंब्याचं नुकसान झालंय. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषेद दिलीय.

तटकरेंनी मांडला विधान परिषदेत प्रश्न

औचित्याच्या मुद्दाद्वारे कोकणातील आंबा नुकसानीचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडला. गेले काही दिवस वातावरण ढगाळ आहे.

आंबा उत्पादकाला मिळणार दिलासा

कोकणात काही ठिकाणी पाऊसही झाला. यामुळे आंबा उत्पादक हवालदिल झाला आहे. याबाबत लक्ष घालण्याची मागणी तटकरे यांनी केली. त्यावर उत्तर देताना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती पाटलांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *