10 वीच्या विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा गळा चिरून खून करण्यात आलाय.

ही घटना निगडीतील पूर्णानगर घडलीय. वेदांत जयवंत भोसले असं खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. वेदांत हा निगडीतील माता अमृता शाळेत  दहावीमध्ये शिकत होता. त्याच्या हत्येचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे.

कधी घडला हा प्रकार?  

15 वर्षाच्या वेदांतचा सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास खून झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास एकजण जखमी अवस्थेत पूर्णानगर येथे पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना वेदांत जखमी अवस्थेत दिसून आला. त्यास रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

का केली हत्या ?

वेदांत हा निगडीतील माता अमृता शाळेत दहावीमध्ये शिकत होता. मैत्रिणीसोबत अभ्यास केल्यानंतर रात्री तो तिला सोडण्यासाठी गेला होता. तिला सोडून तो परत घरी येत असताना हा हल्ला झाला. प्रेमप्रकरणावरून त्याचा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत तपास सुरू आहे.

पूर्णानगर येथील चौकात वेदांत एकटाच असल्याचे पाहून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढवला. या टोळक्याने त्याच्या गळा, डोके व मानेवर सपासप वार केल्याने वेदांत गंभीर जखमी झाला. प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार पाहताच त्यांनी मदतीसाठी वेदांतच्या दिशेनं धाव घेतली, त्यावेळी आरोपींनी तेथून पळ काढला. 24 तासांच्या आत ही घटडलेली दुसरी घटना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *